अलेक्स् फर्नांडेझ करंडक स्पर्धेत 12 संघांचा समावेश

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : चौथ्या कै.अ‍ॅलेक्स् फर्नांडेझ करंडक 2018 स्पर्धेमध्ये 12 संघांनी भाग घेतला असून ही स्पर्धा फोर्ट (किला) मैदान, अहमदनगर क्लब लिमिटेड जवळ येथे शनिवार, 17 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. शिवाजीयन्स्चे अध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी सांगितले की, शिवाजीयन्स् एस.सी. यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटना (एडीएफए) चे माजी सचिव अलेक्स् फर्नांडेझ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा आयोजित केली जाते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अ‍ॅलेक्स् हे वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेचे सहसचिव होते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये फुटबॉलच्या विकासासाठी अलेक्स् यांनी भरीव कार्य केले आहे. या स्पर्धेला मॅक्सीमस स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी यांनी पाठींबा दिला आहे. मॅक्सीमस स्पोर्टस्चे नरेंद्र फिरोदीया म्हणाले की, या स्पर्धेशी सलग्न होऊन आम्हाला अतिशय आनंद होत आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या अलेक्स् फर्नांडेझ यांना अभिवादन म्हणूनही आम्ही या स्पर्धेला सर्वोतोपरी सहकार्य करत आहे.

या स्पर्धेत दोन वेळेचे विजेते लॉरेन्स् एफसी (2014-15 व 2016) तसेच दोन वेळेचे उपविजेतेपद पटकालेला शिवाजीयन्स् संघ यांच्यासह 12 वरिष्ठ गटातील संघ सहभागी होत आहे. अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव गॉडविन डिक यांनी सांगितले की, ही स्पर्धा अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या मान्यतेखाली होत आहे. तसेच ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरीमध्ये खेळवण्यात येणार आहे. 12 संघ 4 गटांमध्ये विभागले गेले आहेत. गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना शनिवार, 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 5 हजार रूपये तसेच उपविजेत्या संघाला करंडक व तीन हजार रूपयांचे पारितोषिक मिळणार आहे. ही रोख पारितोषिके अलेक्स् फर्नांडेझ यांच्या कुटूंबियांकडून देण्यात येणार आहेत. यासह सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, मध्यरक्षक, स्ट्राईकर आणि उदयोन्मुख खेळाडू अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.