सरकारने राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा धसका घेतला !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादीच्या तिसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल यात्रेला उत्तर महाराष्ट्रातून प्रारंभ झाला असून, आज हल्लाबोल यात्रेदरम्यान राष्ट्रवादीच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार,विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
दरम्यान यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला असून, सरकारने राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा आणि बीडचा धसका घेतला असून, ज्या-ज्या वेळी हल्लाबोल यात्रा सुरु होते, त्यावेळी मुख्यमंत्री बीडला येत असल्याचं त्यांनी म्हंटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, पक्षाने जी लढाई सुरू केली आहे, ती लढाई सर्वांसाठी आहे. या लढाईला जनतेचा आशीर्वाद हवा आहे. तरच.3. आमचं हे आंदोलन यशस्वी होऊ शकते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.