ओठांवर राम आणि पोटात नथूराम असलेल्या सरकारला सत्तेतून पायउतार केले पाहिजे - अजित पवार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर, या बंद नोटा दिलेल्या मुदतीत जिल्हा सहकारी बँकांनी ग्राहकांकडून स्वीकारल्या होत्या.मात्र आता या नोटा घेण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या बँका आणि अर्थव्यवस्था अडचणीत येणार असून, त्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हंटले आहे. ते श्रीगोंदामध्ये आयोजित मेळाव्यात बोलत होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पुढे बोलताना ते म्हणाले 'निवडणुकीवेळी देशातील जनतेला आश्वासने देणाऱ्या भाजपने आता फसवणूक केली आहे. या विरोधात सर्वांनी एकजूट केली नाही; तर देशात हुकूमशाही आणि वर्णव्यवस्था येईल. 'ओठांवर राम आणि पोटात नथूराम' असलेल्या या सरकारला सत्तेतून पायउतार केले पाहिजे. देशाच्या इतिहासात प्रथमच स्टेट बँक तोट्यात आहे. यावरून अर्थव्यवस्थेची कशी वाट लागली आहे हे स्पष्ट होते.'

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्तर महाराष्ट्रात सरकार विरोधात हल्लाबोल आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या हल्लाबोल आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयश येत असून,नको त्या व्यक्ती मोकाट फिरत असल्याचं पवार यांनी म्हंटल आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की ,आज लोकांना आर. आर. पाटील राज्याचे गृहमंत्री असतानाच काळ आठवतो आहे. हे सरकार लोकांना रोजगार देण्यात देखील अपयशी ठरले असून,ते लोकांना भजे आणि पकोडा तळण्याचे सल्ले देत आहेत. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. मंत्रालयाचे नाव आधी सचिवालय होते. आज ते आत्महत्यालय झाले आहे. कुणी आत्महत्या करु नये, यासाठी मंत्रालयात जाळी लावली आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी नाराज, नैराश्यग्रस्त आहे. मग चांदा ते बांदा जाळी कशी लावाल?

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.