आता थांबायचं नाही, लढायचं... प्रतापराव ढाकणे यांना समर्थकांचे आवाहन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दिल्लीचे तख्त गाठण्याचे काम माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांनी केले. त्यांच्या राजकीय कार्यकाळानंतर पाथर्डी तालुक्याला कणखर नेतृत्व लाभले नाही. केदारेश्वर सहकारी साखर कारखाण्याचे अध्यक्ष ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी अनेकांना मोठं केलं.आपल्या कार्यकर्त्यासाठी पक्षासाठी सतत संघर्ष केला. मात्र, पदरात काहीच पडलं नाही, त्यामुळे आता थांबायच नाही तर लढायचं, अशी भूमिका तुम्ही घ्या असे आवाहन ॲड. ढाकणे यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्याला केले आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे बुधवारी ॲड. ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काही ठराविक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी काका आजून किती दिवस दुसऱ्यांसाठी संघर्ष करायला लावता, असे म्हणत माजी आमदार कै. राजीव राजळे यांच्या निधनामुळे तालुका पोरका झाला आहे. तालुक्याला तुमच्या सारख्या सक्षम, संघर्षशिल आणि अनुभवी राजकीय नेत्याची गरज आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यामुळे तुम्ही आगामी लोकसभा किंवा विधानसभा कोणत्याही निवडणुकीत उतरावं, अशी आमची इच्छा असून, आता थांबायचं नाही तर लढायचं, अशा शब्दांत ढाकणे समर्थकांनी आपल्या नेत्याला निवडणूक लढवण्याची गळ घातली. आणखी किती दिवस इतरांसाठी संघर्ष करणार ? प्रतापकाका तुम्ही पदावर नसल्याने राजकीय नेत्यांचे नव्हे ; परंतु तालूक्यातील सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले असल्याची खंत सुरेश साखरे, बाजार समितीचे संचालक अशोकराव अकोलकर, हरिभाऊ कारखिले, रामदास बुटे, पंढरीनाथ आठरे, सीताराम सावंत, भाऊसाहेब कारखिले, उद्धव दुसुंग, रामनाथ पालवे, बापूसाहेब शेरकर, रावसाहेब दानवे, मुरलीधर मोरे,भाऊसाहेब अकोलकर यांनी व्यक्त केली. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.