ट्रकच्या आणि मोटारसायकलच्या धडकेत तरुण जागीच ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासा तालुक्यातील पाचेगाव फाट्यावर बुधवार रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास श्रीरामपूर वरून नेवाशाच्या दिशेने सिमेंट घेऊन जात असलेल्या ट्रक (एम.एच. ०४ डी.एस. ६५३५) व मोटारसायकल (एम.एच.१७ एल. २२१०) यांच्या झालेल्या जोरदार धडकेत कारेगाव (ता. श्रीरामपूर) येथील भाऊसाहेब दीपक वायकर (वय ३२) याचा जागीच मृत्यू झाला. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
वायकर मंगळवारी त्याची सासुरवाडी (मु.पो. भेंडा, ता. नेवासा) येथे आपली पत्नी बनुबाई,मुलगा विवेक, मुलगी तेजश्री यांना सोडून येणार होते, परंतु रात्री उशिर झाल्याने ते बुधवारी सकाळी आपल्या गावी कारेगावला येण्यासाठी निघाले. पाचेगाव फाटा येथे सामोरासमोर झालेल्या धडकेत वायकर यांचा जागीच मृत्यू झाला. नेवासा पोलिस स्टेशनला ही माहिती कळताच ॲँब्युलन्स पाठविण्यात आली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. वायकर याच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात आले. नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रं.न.६५/१८ भादंवि कलम ३०४ नुसार वाहन चालक संदीप रामदास चौरे, रा. गंगावाडी ता. गेवराई, जिल्हा बीड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.