नगर जिल्ह्यात 214 चारा घोटाळे करणारे ‘लालूप्रसाद’ !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 2012 ते 14 च्या कालावधीत उद्भवलेल्या दुष्काळाच्या दरम्यान जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या 426 चारा छावण्यांत अनियमितता आढळून आली होती. या प्रकरणी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या आदेशानंतर गेल्या दोन दिवसांत चारा छावण्या चालविणार्‍या 214 संस्थांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. यात श्रीगोंदे तालुक्यातील तब्बल 81 संस्थांचा समावेश आहे. चारा छावणी चालविणार्‍या या संस्था राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मातब्बरांच्या असल्याने खळबळ माजली आहे. 

File Photo
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
भारतीय दंडविधान 1860 मधील कलम 188 प्रमाणे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार संबंधित तालुक्यातील तहसीलदारांच्या आदेशाने मंडलाधिकार्‍यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार हे गुन्हे पोलिस ठाण्यात नोंदविले जात आहेत. यात श्रीगोंदे तालुक्यातील 81 , नगर-40, कर्जत -70 पाथर्डी-22 आणि नेवासे तालुक्यातील 9 संस्थांचा समावेश आहे. 

अनियमितता आढळून आल्यावर या छावण्या चालविणार्‍या संस्थांची तपासणी करण्यात आली. त्यात अनेक ठिकाणी अनियमितता आढळली. या पाचही जिल्ह्यांत चारा छावण्या चालविणार्‍या संस्थांविरोधात केलेल्या दंडात्मक कारवाईत सुमारे सात कोटी 92 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. चारा छावण्या चालविणार्‍या 426 संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

 63 लाख 66 हजार 885 रुपयांचा दंड प्रशासनाने या संस्थांकडून वसूल केला. मात्र, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने राज्य सरकारकडे या संदर्भात विचारणा केली. दंडात्मक कारवाई झालेल्या संस्थांविरोधात आता फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.