भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पुतळा जाळला !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यावर टीका केल्याचा आरोप करत निषेध करण्यासाठी क्रांशेपने आमदारांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. भाजपने या घटनेच्या निषेधाचे निवेदन देत प्रति आंदोलन केले. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
एका कार्यक्रमात आमदार मुरकुटे यांनी गडाखांवर टीका करताना नाग, भोकाडी असे शब्द वापरून टीका केल्याने क्रांशेपमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सकाळी दहा वाजता क्रांशेप कार्यकर्त्यांनी नगरपंचायत चौकात जमून निषेधाच्या घोषणा देत मुरकुटे यांचा पुतळा जाळला. 

यावेळी नारायण लोखंडे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, रामभाऊ जगताप, कारभारी वाखुरे, बाळासाहेब कोकणे, नगरसेवक सचिन वडागळे, राजेंद्र चौधरी, अण्णा पेचे, राम केंदळे, सुनील धायजे, महेश मापारी, संदीप बेहळे, सतीश पिंपळे, जावेद इनामदार, संजू कदम, दत्तात्रय गडाख उपस्थित होते. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तालुक्याला सुसंस्कृत राजकारणाची सवय आहे. ज्यांनी राजकारण शिकवले, त्यांच्याच विरुद्ध टीका करणाऱ्या व जय हरी म्हणवणाऱ्या आमदारांनी काळिमा फासला. सरकारी पैशांवर कामे करणाऱ्यांनी गडाखांसारखे शैक्षणिक संस्था, कारखाने, बँका उभा करणाऱ्यांसमोर लायकी पाहून टीका करावी. अमृतमहोत्सवाची यांना पोटदुखी झाली. मर्यादा सोडून टीका केल्यास कार्यकर्ते त्यांना धडा शिकवतील. एक दिवस ते त्यांना तुडवतील, अशी टीका कार्यकर्त्यांनी केली. 

या प्रकाराने चिडलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दुपारी ४ वाजता नगर पंचायत चौकातच निषेध सभा घेतली. आमदारांचा पुतळा जाळण्याच्या, तसेच गलिच्छ घोषणा देणाऱ्या शैक्षणिक संस्थेतील कर्मचारी व कार्यकर्त्यांची चौकशी व्हावी, असे निवेदन तहसीलदार जायकर यांना देण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.