श्रीगोंदा बाजार समितीत व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला धक्काबुक्की.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत एका व्यापाऱ्याकडून कर्जत तालुक्यातील शेतकऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली. हा प्रकार आज दि.१३ रोजी दुपारी घडला. याबाबतची माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील एका शेतकऱ्याने शेतमाल विकण्याबाबत श्रीगोंदा बाजार समितीतील एका व्यापाऱ्याशी फोनवर चर्चा केली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शेतमालाचा दर ठरल्यानंतर हा शेतकरी आज़ आपला माल घेऊन श्रीगोंदा बाजार समितीत आला. या शेतकऱ्याने आपला सदर व्यापाऱ्याला विकला. परंतु मालाचे पैसे देताना हा व्यापारी ठरलेल्या दरापेक्षा कमी पैसे देऊ लागला, यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यात वाद झाला. यातूनच या व्यापाऱ्याने शेतकऱ्याला धक्काबुक्की केल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या प्रकारानंतर शेतकऱ्याने बाजार समिती सचिवांना फोन करून माहिती दिली; परंतु ते बाहेरगावी असल्यामुळे शेतकऱ्याला तक्रार देता आली नाही. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला धक्काबुक्की झाल्याचे समज़ताच अनेकांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, या शेतकऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई केली ज़ाईल. तसेच यामध्ये व्यापारी दोषी आढळल्यास त्याचा परवाना रद्द करू,असे बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.