राष्ट्रवादीचे दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे - प्रा. भानुदास बेरड..

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आघाडीच्या काळात पाटबांधारे, वीज, टँकर घोटाळा करून सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोलची भाषा करत आहेत. जनावरांचा चारासुद्धा सोडला नाही. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शिवराळ भाषेत उत्तर देणारे आता शेतकऱ्यांचे विषय घेऊन रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत. त्यांना जनता रस्त्यावरच धडा शिकवेल, अशी घाणाघाती टिका भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगर जिल्ह्यातील सन २०१२-१३ व २०१३-१४ या काळातील ४२६ छावण्यातील जनावरांचा चारा घोटाळा उघड झाल्याने राष्ट्रवादीचे दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे हे जनतेसमोर आले आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्यांनी जनतेला नैतिकता शिकविण्याची गरज नाही, असेही त्यांनी सुनावले आहे.

बेरड यांनी म्हटले आहे, तीन वर्षाच्या भाजप व मित्र पक्षाच्या सरकारने सर्वसान्यांना केंद्रबिंदू मानुन योजना राबविल्या. या योजना आता जनतेपर्यंत पोहचल्या आहेत आणि त्या महत्त्वकांक्षी ठरल्या आहेत. जनतेचा आता त्याचा फायदा थेट जाणवू लागला आहे. त्यामुळे विरोधक चांगले धास्तावले आहेत. सत्तेवाचुन आपण राहुच शकत नाही. अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात गोळा आला असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे'. 

आपले दृष्यकृत्य लपविण्यासाठी व आघाडी सरकारच्या काळात केलेले घोटाळे पुन्हा बाहेर येऊ नये म्हणुन आंदोलनाची हत्यार वापरले जात आहे. त्यासाठी सर्वसामान्य जनतेची खुबीने दिशाभूल करण्यात येत आहे. विरोधी पक्ष हा विरोधासाठीच असतो. पण विरोध करताना आपले स्वत:चे पाप झाकण्यासाठी का? जनतेच्या प्रश्­नांसाठी याचा उलघडा अगोदर विरोधकांनी केला पाहिजे, असेही ते म्हणाले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.