रॉड व दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-औरंगाबाद महामार्गावर शनिवार दि. १० रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दोघा जणांनी एकास लाकडी दांडक्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फ्रान्सेस ताराचंद देठे (वय ४२, रा. शेंडी, ता. जि. नगर) हे शनिवार दि. १० रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास महामार्गावरून जात असताना चेतना हॉटेलसमोर त्यांच्या पाठीमागून आलेल्या शुभम भिंगारदिवे व भूषण भिंगारदिवे याने गाडी बाजूला थांबविण्यास सांगून शिवीगाळ करत हातातील रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करत नगरमध्ये दिसल्यास मुडदा पाडील अशी जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी देठे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो. हे. कॉ. शिरसाठ हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.