सोनईत बसलेला भोकाडी हा तालुक्याला लागलेला कलंक: आमदार मुरकुटे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तुम्ही किती लोकांना चिमटे काढले, किती आऱ्या टोचल्या, असे एकही कुटुंब नाही की, यांनी चिमटे काढले नाही. कितीही त्रागा केला, तरी यांना प्रायश्चित्त नाही. सोनईत बसलेला भोकाडी तालुक्याला लागलेला कलंक आहे, अशी टीका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गडाखांचे नाव न घेता मंगळवारी केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
गिडेगाव ग्रामपंचायतीच्या प्राथमिक शाळा, जलवाहिनी व ग्रामपंचायत कार्यालयाच्या संरक्षक भिंतीचा लोकार्पण सोहळा मुरकुटे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. आजपर्यंत यांनी तालुक्याला काहीही दिले नाही. मागील निवडणुकीत आपण गुप्त धनावरील नागाचा बंदोबस्त केला. आता तालुक्याचा विकास कुणीही रोखू शकत नाही. रस्ते, वीज, पाटपाणी व पिण्याचे पाणी देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. हे प्रश्न मी सोडवत आहे. त्यांना निवडून दिले, तर विकासाला खीळ बसेल. तालुका विकासाच्या मार्गावर आहे, असेही मुरकुटे म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश साळुंके यांनी केले. यावेळी पुरुषाेत्तम सर्जे, नवनाथ साळुंके, एकनाथ भगत, भाऊसाहेब नगरे, भाऊसाहेब कर्डिले, कल्याण साळुंके, संभाजी आगळे, बबन साळुंके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.