शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी टीडीएफ उमेदवार निवडीचा वाद पुन्हा चिघळला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी टी.डी.एफ. चे कार्याध्यक्ष फिरोज बादशाह यांनी मालेगाव येथे झालेल्या बैठकित भाऊसाहेब कचरे (नगर) यांची उमेदवारी जाहिर केली असता या उमेदवारीला निवड समितीच्या सदस्यांसह आठ इच्छुक उमेदवारांनी विरोध दर्शविला. तर ही निवड आर्थिक देवाण-घेवाणीतून झाल्याचा आरोप त्यांनी केला.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आर्थिक हितापोटी शिक्षक नसलेल्या व्यक्तीस पुणे येथे उमेदवारी जाहिर केल्याने टी.डी.एफ. चे कार्याध्यक्ष फिरोज बादशाह यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक उमेदवार देण्यासाठी दहा उमेदवार एकत्र आले होते. पुन्हा मालेगाव येथे कचरे यांच्या निवडीवरुन हा वाद उफळला आहे. जाहिर झालेल्या या उमेदवारीला विरोध दर्शवीत या आठ इच्छुकांमधून उमेदवार देण्यासाठी स्वतंत्र्य बैठक घेण्यात आली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी निवड समिती सदस्य एच.जी. इंगळे, चांगदेव कडू, सुभाष कुलकर्णी, इछुक उमेदवार आप्पासाहेब शिंदे (नगर), शालीग्राम भिरुड (जळगाव), एम.एस. लगड (नगर), विठ्ठल पानसरे (नगर), आर.डी. निकम (नाशिक), निशांत रंधे (धुळे), अजित लाठर (मालेगाव), एस.बी. देशमुख (नाशिक) आदि उपस्थित होते.
कचरे हे टीडीएफ चे सदस्य नसून, त्यांनी गैरमार्गाने उमेदवारी मिळवल्याचा आरोप बैठकित करण्यात आला. येत्या दोन दिवसात या आठ पैकी एकाची नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्कामोर्तब होणार असून, यामध्ये आप्पासाहेब शिंदे यांचे नांव आघाडीवर आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.