कीर्तनकार मुलीला लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कीर्तनकार मुलीला लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केल्याची घटना शहरात घडली. परसराम डोंगरे (रा. आंधळेवाडी, जि. बीड) असे अत्याचार करणाऱ्याचे नाव असून तो पखवाजवादक आहे.पीडित मुलगी आळंदी येथे एका धर्मशाळेत भजन - कीर्तनाचा कार्यक्रम करते. ती मूळची आष्टी तालुक्‍यातील आहे. जून 2017 मध्येआषाढी वारीत पखवाज वादक परसराम डोंगरे याची या मुलीसोबत ओळख झाली होती. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
14 सप्टेंबर 2017 रोजी आरोपी परसरामने या मुलीस फोन करून पोखरी येथे संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम असल्याचेसांगितले. त्याने मुलीला जामखेड येथे बोलावून घेतले. त्या दिवशी सौताडा येथे देवदर्शन करुन आल्यावर पोखरी येथील भजन रद्द झाले, असे त्याने मुलीला सांगितले. यानंतर लग्नाचे आमीष दाखवून त्याने जामखेडमधील एका लॉज मध्ये मुलीवर अत्याचार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मुलीने लग्न करण्याची वारंवार मागणी करुनही परसरामने टाळाटाळ केल्यानंतर तिने जामखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेनंतर पाच महिन्यांनी पीडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून परसराम डोंगरेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.