नगर रेल्वेस्थानक विकासाच्या दिशेने सुसाट !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरामदायी प्रतीक्षालय, आदी सुविधा रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करून देणारे अहमदनगर हे स्थानक रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण ठरले आहे. देशात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावलेल्या अहमदनगर रेल्वेस्थानकाच्या प्रगतीची वाटचाल सुरूच आहे. आता या स्थानकावर वाय-फायची सुविधाही प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येणारे नगर रेल्वेस्थानक महत्त्वाचे स्थानक असून, विकासाच्या दिशेने सुसाट सुटले आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
एप्रिल 1878 मध्ये दौंड-मनमाड या लोहमार्गावरील नगरचे रेल्वेस्थानक कार्यान्वित झाले. पुणे, कोल्हापूर व दक्षिण भारतातून उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वेंसाठी दौंड-मनमाड हा महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ग्रेट इंडियन पेनिनसुलामार्फत 1868 मध्ये व नंतर तत्कालीन पीडब्लूमार्फत 1876 मध्ये दौंड-मनमाड या 197 किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाच्या निर्मितीसाठी त्याकाळी तब्बल 1 कोटी 35 लाख रुपये निधी खर्च झाला होता. 140 वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सेवेसाठी हे स्थानक कार्यान्वित झाले. मागील दीड शतकाच्या वाटचालीत बदलत्या काळानुसार रेल्वे प्रवाशांना उत्तम दर्जाची सुविधा देत या स्थानकाने देशभरात अग्रक्रम मिळवला.

पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रतीक्षालये याबरोबरच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बुकिंग काउंटर या विभागात बसविण्यात आले आहे. 2017 मध्ये उत्कृष्ट व्यवस्थापन आणि प्रवासी सुविधा असणाऱ्या या रेल्वेस्थानकाने देशात तिसरा क्रमांक मिळवला. रेल्वेस्थानकाच्या परिसरातील स्वच्छता, टापटीप ही नजरेत भरणारी असून, नगर शहरातील प्रेक्षणीय आणि रमणीय स्थळ म्हणून नगर रेल्वेस्थानकाचा उल्लेख केला तर वावगे ठरणार नाही.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नगर जिल्ह्यातील दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम मार्गी लागले. दौंड-मनमाड या 247 किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, आता सिंगल रेल्वे रूळ असलेल्या या मार्गाचे तब्बल 140 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुहेरीकरण होणार आहे. केंद्र सरकारने त्यास मंजुरीही दिली आहे. दुसरीकडे नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाचे काम प्रगतिपथावर आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ मार्गदर्शनानुसार अहमदनगर रेल्वेस्थानक रेल्वे प्रवाशांना सर्व सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुविधापूर्ण होणे हा आमचा उद्देश आहे. मागील सप्ताहात स्थानकावर प्रवाशांना वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक्‍स्लेटर अर्थात सरकत्या जिन्याचे काम सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.