बालिकाश्रम रोडवर दोघांना मारहाण ; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बालिकाश्रम रस्त्यावर शुक्रवार दि. ९ रोजी सकाळी फिरायला गेलेले असताना दोघा जणांना मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अक्षय जाधव हे आपले चुलते आदिनाथ वनाजी जाधव यांच्या सोबत बालिकाश्रम रोडवर सकाळी फिरण्यासाठी गेले होते. यावेळी योगेश राजेंद्र जाधव, नंदकिशोर विठ्ठल जाधव, आकाश पांडुरंग जाधव, पांडुरंग रंगनाथ जाधव, विठ्ठल रंगनाथ जाधव, भरत बाबुराव जाधव, मंदाबाई विठ्ठल जाधव (सर्व रा. जाधव मळा) यांनी अक्षय जाधवला अडवून तुम्ही जास्तच शहाणे झाले आहे का? असे म्हणत आमच्याकडे पाहून शिवीगाळ का करता असे म्हंटले व दांडके आणि सिमेंट ब्लॉकने आदिनाथ व अक्षय जाधव यांना मारहाण केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तसे योगेश जाधव, नंदकिशोर जाधव व विठ्ठल जाधव यांनी लाकडी दांडक्याचे सहाय्याने अक्षय व आदिनाथ जाधव यांना मारहाण करत तलवारीने कापून टाकू अशी जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. हे. कॉ. मोरे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.