संगमनेर मध्ये दुचाकीच्या धडकेत एक ठार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : संगमनेर तालुक्यातील कऱ्हेफाटा येथे दुचाकीने जोराची धडक दिल्याने रस्त्याच्याकडेला उभा असलेला एकजण जागीच ठार झाला. साहेबराव देमाजी चौधर (वय ४५, रा. मालुंजे, ता. संगमनेर) असे दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. रविवारी ( दि. ११) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हेफाटा येथे ही अपघाताची घटना घडली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
संगमनेर तालुक्यातील कऱ्हेफाटा येथे रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास साहेबराव देमाजी चौधर (रा. मालुंजे) हे रस्त्याच्याकडेला उभे होते. दरम्यान, भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने (क्र. एमएच १५ एफएस ००२६ ) चौधर यांना धडक दिली. झालेल्या अपघातात जबर मार लागल्याने साहेबराव चौधर जागीच ठार झाले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दुचाकी चालक निशांत विश्वास गायकवाड व त्याच्या समवेत असलेला मंगेश भाऊसाहेब गायकवाड हे देखील जखमी झाले. याबाबत कचरू भागुजी सानप (रा. कऱ्हे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी निशांत विश्वास गायकवाड (रा. भगवतीपूर, ता. सिन्नर) याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.