श्रीरामपूरच्या व्यावसायिकाची २ कोटींची फसवणूक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : श्रीरामपूर येथील व्यावसायिकाची चार नायजेरियन भामटयांनी संगनमताने २ कोटी ४ लाख रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी नगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विपीन चुडीवाल (रा. श्रीरामपूर) व त्यांचा मित्र यांना दि. १३/०६/२०१७ रोजी जेनी मोरी या महिलेचा ई-मेल आला. ती महिला झोनो ग्रो ग्रीक कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करते, असे तिने सांगत त्यांच्या कंपनीस भारतातील कुनाल रेड्डी हे जनावरांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणारे द्रव्य पुरवीत होते. ते गुजरात मधील राजू मॅन्युफॅक्चरींग येथून घेत असल्याचे सांगत त्यांचे अचानक निधन झाले आहे. तुम्ही हे द्रव्य पुरवत असाल तर एका गॅलनमागे रु. २५ लाख नफा मिळेल असे सांगितले. त्याप्रमाणे एक लिटर एवढे द्रव्य सॅम्पल म्हणून पाठविण्यास सांगितले.

त्यानूसार श्री. चुडीवाल यांनी राजू मॅन्युफॅक्चरींग कंपनीकडे एक लिटर द्रव्य सॅम्पल म्हणून मागविले व त्यांनी राजू मॅन्युफॅक्चरींग या कंपनीस रु. ३ लाख ९४ हजार रुपयांची रक्कम आरटीजीएस केली. ते सॅम्पल चुडीवाल यांनी आरोपीस मुंबई येथे नेऊन दिले. ते सॅम्पल पास झाल्याचे झोनो ग्रो ग्रीक कंपनीकडून चुडीवाल यांना कळवून १०० गॅलनची ऑर्डर दिली. त्यापैकी १० गॅलन तात्काळ खरेदी करून देण्यास सांगितले. त्याप्रमाणे चुडीवाल यांनी ३ जुलै २०१७ ते १६ ऑगस्ट २०१७ राजू मॅन्युफॅक्चरींग कंपनीकडे वेगवेगळ्या १८ बॅंक अकौंटवर रुपये १ कोटी ९४ लाख ६९ हजार ४०० रुपये आरटीजीएसने भरले.

त्यानंतर त्यांना दोन ॲल्युमिनियमच्या कॅनमध्ये १० गॅलन द्रव्य घरपोच दिले. कंपनीचे डॉ. जॉन शेफर्ड यांना फोन करताच त्यांनी मुंबई बीकेसी येथे १० गॅलन आणून देण्यास सांगितले. त्याप्रमाणे चुडीवाल हे मुंबई येथे ते द्रव्य घेऊन गेले. परंतू तेथे कोणीही ते घेण्यासाठी आले नाही, म्हणून चुडीवाल यांनी कंपनीचे डॉ. जॉन शेफर्ड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अजून ५ गॅलनची आवश्यकता आहे, त्यामुळे १५ गॅलन एकत्र आणून द्या असे सांगितले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
श्री. चुडीवाल यांनी परत १० लाख २५ हजार रुपये राजू मॅन्युफॅक्चरींग या कंपनीच्या अकौंटवर भरले. त्यानंतर त्यांनी १५ गॅलन द्रव्य त्यांच्याकडे तयार असून ते कोठे पाठवायचे याबाबत डॉ. जॉन शेफर्ड, जेनी मेरी यांच्याशी संपर्क केला. मात्र त्यांचा संपर्क झाला नाही. तसेच राजू मॅन्युफॅक्चरींगचे राकेश अमीन यांचाही संपर्क झाला नाही. 

तेव्हा या सर्वांनी आपली संगनमताने २ कोटी ४ लाख ८४ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानूसार त्यांनी जेनी मेरी, डॉ. जॉन शेफर्ड, राकेश अमीन व एका अज्ञात इसमांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल पवार हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.