जिल्हा मुख्यालय कोठे करायचे हे सर्वस्वी माझ्याच हातात - प्रा.राम शिंदे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : पूर्वीच्या सरकारमध्ये जिल्ह्यात तीन मंत्री होते. आता मी एकटाच आहे. त्यांनी जिल्हा विभाजनाचा खेळ केला. नेतृत्वाने त्यांना एकमत करण्यास सांगितले होते. मात्र, एकमत होऊ शकले नाही. आता खेळ होणार नाही. मुख्यालय कोणते करायचे, काय प्रस्ताव पाठवायचा हे सर्वस्वी माझ्याच हातात असल्याने जिल्हा विभाजन निश्चित असल्याचा पुनरुच्चार पालकमंत्री राम शिंदे यांनी सोमवारी केला. याबाबत उपसमिती नेमली असून जिल्हा विभाजनासोबत तालुक्यांचीदेखील निर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
संगमनेर तालुक्यातील अकलापूर याठिकाणी शेतकरी मेळावा व जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, अशोक भांगरे, दिलीप साळगट, अशोक इथापे, अशोक सातपुते, किशोर डोके, जालिंदर वाकचौरे, अशोक वाघ, संतोष देवकर, शिवाजी तळेकर, किरण लहामटे आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. शिंदे म्हणाले, जिल्हा कोणता करायचा यावर एकमत नसल्याने अडचणी येत आहे. परंतु, जिल्हा उपसमीतीचा अहवाल आल्यानंतर सर्वांशी चर्चा करून एकमताने नगर जिल्ह्याचे विभाजन करणारच. यापूर्वी पठारभागाचा पाहिजे तेवढा विकास झाला नाही. मात्र, भाजप - सेनेच्या साडेतीन वर्षांच्या काळात संगमनेर व अकोले तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम आपण केले आहे. त्याचबरोबर भोजदरी ते वनकुटे या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर केले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अकलापूर वांदरकडा केटीवेअरला नवीन ढापे दिले. त्यामुळे पाणी आडले, पण आता त्याचे श्रेय दुसरेच घेताहेत, असे सांगत ते म्हणाले, अकलापूर देवस्थानचा पर्यटन स्थळामधये समावेश करण्यासाठी देवस्थानला जास्तीत जास्त निधी मिळून देण्यासाठी पर्यंत करणार आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर हे कुठल्याही पक्षाच्या पालकमंत्र्याच्या संपर्कात असायचे. मात्र, मी पहिला असा पालकमंत्री आहे की, जनार्दन आहेर यांचे समाजकार्य पाहून मीही त्यांच्या प्रेमात पडलो आहे. त्यामुळे भाजप - सेना युतीचा निर्णय काय होईल याची वाट न पाहता आहेर यांनी योग्य निर्णय घ्यावा, असेही ना. शिंदे म्हणाले.यावेळी जालिंदर वाकचौरे, किरण लहामटे, अशोक भांगरे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन शिवाजी तळेकर यांनी केले. यावेळी या कार्यक्रमासाठी शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.