लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरवर शिर्डीत बलात्कार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  लग्नाचे आमिष दाखवून संगमनेरच्या महिला डॉक्टरवर शिर्डीतील हॉटेल व शासकीय विश्रामगृहात वेळोवेळी बलात्कार झाला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विजय अण्णासाहेब मकासरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस त्वरित अटक करावी, त्याला शासकीय विश्रामगृह कसे दिले गेले याची चौकशी करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी विजय मकासरे (रा. वळण, ता. राहुरी, ह.मु. इंदिरानगर, श्रीरामपूर) याने संगमनेर तालुक्यातील एका डॉक्टर तरुणीची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. तिला मकासरे याने लग्नाचे आमिष दाखविले. त्यानुसार आळंदी येथे नेऊन खोटे कागदपत्र तयार करून लग्न केल्याचा बनाव केला. एक वर्षाच्या दरम्यान शिर्डीतील दोन खासगी हॉटेल, शासकीय विश्रामगृहात अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वेळोवेळी अत्याचार केला तसेच मारहाण करून धमकी दिल्याचे फिर्यादी म्हटले आहे.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६/१८, भादंवि कलम ३७६, ४९५, ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदिप दहिफळे अधिक तपास करीत आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दरम्यान, जानेवारी २०१७ मध्ये त्याने 'ह्युमन राईट' संघटनेचे कार्ड वापरून विश्रामगृहाचा वापर केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. तसेच आपले लग्न झालेले असल्याचे सदर पिडीत तरुणीपासून लपवून ठेवत सोबत आळंदी येथे विवाह लावला व याची नोंदणीही केल्याचे या तरुणीने सांगितले आहे. मात्र, त्याठिकाणी खरेच नोंदणी केली आहे किंवा काय याची चौकशी करावी लागेल. तसेच मकासरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून त्याचा कसून शोध सुरू असल्याचेही असे तपासी अधिकारी उपनिरीक्षक दहिफळे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.