भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यावर चारा छावणी प्रकरणी गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सन २०१३ -१४ च्या दुष्काळात चालवलेल्या छावण्यांमध्ये अटी व शर्तीचे पालन केले नसल्याच्या प्रकरणात भाजपचे नेवासा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश रघुनाथ कर्डिले याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच नेवासा बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांच्यासह इतर तिघांवरही याच प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या प्रकरणात नेवासा तालुक्यातील पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यात महेश म्हस्के (जेऊर), दौलतराव देशमुख (कुकाणा), सुदाम रामराव लिपाणे (नांदूरशिकरी) व देवदत्त रघुनाथ पालवे (भेंडा) यांचा समावेश आहे. ही फिर्याद कुकाण्याचे मंडलधिकारी जयंत वसंत दरंदले यांनी दिली आहे.

याबाबत बोलताना भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे दीपक धनगे म्हणाले, की जे यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे व नि:पक्षपणे चौकशी होणे गरजेचे आहे. नेवासा तालुक्यात काही मोजक्याच लोकांना चांगले दिवस आले असून राजकीय वरदहस्त असल्याने 'पाहुणे' व नातेवाईक निर्ढावले आहेत. तालुक्यातील कृषीघोटाळा मी पुराव्यासह बाहेर काढला. परंतु मोठी राजकीय शक्ती खर्च करून तो दाबला जात आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अधिकाऱ्यांना हाताशी धरून दोषी लोक खुलेआम फिरत आहेत. रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली मोठा निधी हडप झाला आहे. त्यातही ठराविक लोकांनाच ठेका मिळत आहे. आमच्या संघटनेकडून याचे लेखी निवेदन संबधीत खात्याला दिले आहे. व याचे पुरावेही दिलेले आहेत. आमचा लढा थांबणार नसून छावणी घोटाळ्यात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई कशी होईल यासाठी पाठपुरावा करू, असे धनगे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.