शहराचा विकास करायचा असेल, तर एकहाती सत्ता द्या - खासदार दिलीप गांधी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहराचा विकास करायचा असेल, तर भारतीय जनता पक्षाकडे एकहाती सत्ता द्या. केडगाव  पोटनिवडणुकीपासून भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. अर्थसंकल्पात नगर-पुणे रेल्वेसाठी तरतूद केली असून, हे काम लवकरात लवकर मार्गी लगाावे, यासाठी प्रयत्नशील आहे. नगर शहरामध्ये लवकरच केंद्र शासन कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
भारतीय जनता पक्षाच्या रेल्वे स्टेशन परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विलास उबाळे, रोहिदास भालेराव, नारायण साळवे, केरबा पोळ, वसंतराव पेटारे, राणी भालेराव, योगेश साळवी, गौतम मेढे, सखाराम पवार, जयराम आखाडे, पंडित झेंडे, राजू साळवे, अर्जुन जाधव, प्रकाश भिंगारदिवे, प्रकाश साळवे, अमर डाके, सुनील भिंगारदिवे, जंबू भालेराव यांनी खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. त्यावेळी गांधी बोलत होते.

उपमहापौर श्रीपाद छिंदम, गीतांजली काळे, किशोर बोरा, जगन्नाथ निंबाळकर, कालिंदी केसकर, अन्वर खान, प्रतीक बारसे, सुधाकर डांगळे, शरद ठुबे, नंदा कुसळकर, धनंजय जामगांवकर, बाळासाहेब पोटघन, केदार लाहोटी, निर्मला भंडारी, सचिन चोरडिया, बाळासाहेब सातपुते उपस्थित होते. यावेळी शाखा उद्घाटन करण्यात आली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
गांधी म्हणाले, 'महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ सर्वानी घ्यावा. नगर शहरामधील सर्वसामान्य जनतेला घरे देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सव्र्हेनुसार १७ हजार लोकांची नावे पुढे आली आहेत. केंद्र सरकार शहराला मोठ्या प्रमाणात निधी देत आहे. परंतु त्याचा विनियोग योग्य पद्धतीने होत नाही. फेज-२ पाणीयोजना आजपर्यंत पूर्ण झालेली नाही.' माजी आमदार म्हणतात की शहराचा विकास हा आपोआप होत असतो. त्यामुळे शहराचा विकास होऊ शकला नाही. विकासासाठी राज्य व केंद्राकडून निधी खेचून आणावा लागतो, तेव्हा विकास होतो, असे सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.