घरफोडी करणारे ५ जण ताब्यात सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नागापूर एमआयडीसीत गुरूवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सव्वा दोन लाखांची घरफोडी करणारे ५ आरोपी मुद्देमालासह ताब्यात घेण्याची कारवाई एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि. विनोद चव्हाण यांच्या पथकाने केली.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एमआयडीसी हद्दीतील जय मल्हार निसान शोरूममध्ये दि. ०८ फेब्रुवारी रोजी सव्वा दोन लाखांच्या मुद्देमालाची चोरी करण्यात आली होती. यामध्ये रोख रक्कमेसह एल. ई.डी टीव्ही चोरीस गेला होता. या गुन्ह्याप्रकरणी अक्षय सुंदरलाल गोरे (वय २०, वडगाव पान, ता. संगमनेर जिल्हा अहमदनगर), भरत सुरेश विधाते (वय १९, रा. टिळकनगर, श्रीरामपूर), सागर सॅमवेल संसारे (वय १९, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी), स्वप्नील विठ्ठल राऊत (वय २२, चेतना कॉलनी, अ. नगर) अर्जून सुभाष मांजरे (वय २२, रा. खंडोबा नगर, चेतना कॉलनी, अ. नगर) यांना अटक केलेली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ही कामगिरी सपोनि विनोद चव्हाण, पोसई गोरे, पोहेका. दत्तात्रय पवार, पोना. प्रविण खंडागळे, पोना. बाळू दाताळ, पोना. परशूराम नाकाडे, राहुल शिंदे, योगेश कवाष्टे यांनी केलेली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.