नगर जिल्हा विभाजनाबाबत कोणताही निर्णय मान्य -चंद्रशेखर घुले पाटील.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा विभाजनाबाबत जो निर्णय होईल तो मान्य असेल. परंतु एवढ्या मोठ्या निर्णयावर फक्त चर्चा होत आहे. रेकॉर्डवर काहीच नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांनी दिली. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुरूवारपासून (ता. १५) हल्लाबोल यात्रेस प्रारंभ होत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. घुले पाटील म्हणाले, 'जिल्हा विभाजन ही प्रक्रिया मोठी आहे. परंतु त्यावर केवल चर्चा होत आहे. प्रत्यक्षात रेकॉर्डवर काहीच येत नाही. जिल्हा विभागजनाबाबत मात्र तो निर्णय होईल तो मान्य असले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
' उत्तरकडे जास्त निधी वळवला जातोय का, यावर ते घुले पाटील म्हणाले, 'आमच्या काळात असे काही झाले नाही. परंतु गेल्या तीन वर्षात झाले असेल, तर सांगता येणार नाही.' राष्ट्रवादीने पक्ष बळकट करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी थेट जनतेशी संवाद साधला जातो आहे, असेही त्यांनी सांगितले. पक्ष सोडून गेलेल्या पुन्हा पक्षात आणले जात आहे का? यावर घुले म्हणाले, 'स्थानिक नेते याबाबत तरी आपल्या संपर्कात नाहीत. परंतु पक्षश्रेष्ठींच्या कोणी संपर्कात असल्यास सांगता येणार नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.