वाचाल तर वाचाल: डॉ.संजय कळमकर .निंबळक मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : टी.व्ही. व मोबाईल च्या जमान्यात माणसा-माणसातला संवाद हरवत चालला आहे.कुटुंबातील प्रत्येक सदस्य या यंत्रा मध्ये गुंतून गेलाय. तोच परिणाम भविष्यातील पिढी असणाऱ्या मुलांवरही होतोय. त्यांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. हे चिंताजनक असून वाचनानेच विद्यार्थ्यांचे भविष्य घडू शकेन,असे प्रतिपादन शिक्षक नेते व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांनी व्यक्त केले.ते निंबळक (ता.नगर) येथील नाथकृपा प्रतिष्ठाण संचलित, 'नाथकृपा क्लासेस व म्हस्के पाटील इंग्लिश मीडियम स्कूल' च्या वार्षिक स्नेह-संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सहा.पोलिस निरीक्षक अ‍ॅड.विनोद चव्हाण यांनी 'नाथकृपा क्लासेस' चे संचालक प्रा.मछिंद्रनाथ म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा-परीक्षा संदर्भातही मार्गदर्शन द्यावे,अशी इच्छा व्यक्त करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले विद्यार्थी प्रशासकीय स्तरावरही आपले कर्तृत्व सिद्ध करतील,असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष,'शिवप्रहार' चे संस्थापक संजीव भोर म्हणाले,प्रा.मछिंद्रनाथ म्हस्के यांच्या सारखा ग्रामीण भागातील एक तरुण नोकरीच्या मागे न लागता 'इंग्लिश मिडीयम स्कूल, व क्लासेस' च्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य करत आहे,ही निश्चितच भूषणावह बाब आहे.सध्या तरुणांना 'तलवारी'ची नाही तर 'शब्दसंपदे'ची खरी गरज आहे.शब्दधन कमवा.आपल्याला वैचारिकदृष्ट्या भरकटविणाऱ्या प्रवृत्तीपासून सावध राहा.विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगा.तरच तुम्हाला तुमचे भविष्य घडवता येईल.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
स्नेह-संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी लावणी,भक्तिगीते,देशभक्तीगीते, लोकगीते तसेच मराठी-हिंदी चित्रपट गीतांवर नृत्य सादरिकरण करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.तसेच प्रबोधनपर नाटिका, शालेय अभ्यासक्रमातील पाठांतर,प्रार्थना,उलटे पाढे याबरोबरच सुरेश वाघ व संदीप तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली कराट्यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिकांनीही प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. स्पर्धा-परीक्षेमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या 'नाथकृपा क्लासेस'च्या माजी विद्यार्थ्यांचाही सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवव्याख्याते प्रा.मारुती शेळके,जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे,सरपंच साधनाताई लामखडे,उपसरपंच घनश्याम म्हस्के, नगरसेवक,डॉ.सागर बोरुडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

महादेव गवळी, राज बांदल, विकास चौधरी, सुनील पिंपळेसर, दादा घोलप सर, विकास घोलप, बाळासाहेब कोतकर, सुनील जाजगे, राहुल गायकवाड, संतोष शिंदे, भाऊसाहेब म्हस्के, शिवम भवर, राहुल दुर्गे, संचित नवले, सुनील पवार, राम बोराटे,राजू नेव्हे, सईराम कोतकर, संदीप लांडे, रामदास गायकवाड, वर्षा म्हस्के, कविता लांडे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.