सुजय विखेंच्या मिशन लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडील नगर दक्षिणची जागा कॉंग्रेसकडे ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर दक्षिण  मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसला वारंवार पराभव पत्करावा लागला असल्याने या पराभूत जागेऐवजी राज्यातील राष्ट्रवादी ला अनुकूल असणारी - जिंकणारी जागा पक्षाला मिळावी असा प्रयत्न राहणार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. त्यामुळे साहजिकच मतदारसंघ कॉंग्रेसकडे जाण्याचे संकेत देत सुजय विखेंच्या मिशन दक्षिण लोकसभेसाठी माघार घेण्याचे संकेत दिले आहेत.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
वारंवारचा पराभव टाळण्यासाठी अनुकूल मतदारसंघ शोधून उमेदवारी मिळविण्याची चाचपणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असला तरी आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मात्र हा मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पक्षाला अनुकूल वातावरण असतानाही शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव झाला होता, त्यानंतर कै. राजीव राजळे ही पराभवाची शृंखला पक्षाच्या दृष्टीने घातक आहे. ही शृंखला तोडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यामुळे आघाडीत पक्षासाठी जिंकणारी जागा मिळावी असा प्रयत्न राहणार आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांकडून आतापासून तयारी सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर पक्षाच्या इच्छुकांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचे गृहीत धरून मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी राज्यपातळीवर नेत्यांच्या मनात मात्र वेगळेच सुरू असल्याचे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याबरोबर चर्चा करताना दिसून आले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नगर दक्षिण लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या वाट्याला !
वारंवार पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागत असल्याची भीती व्यक्‍त करून या नेत्याने त्याऐवजी राज्यातील पक्षाला अनुकूल व जिंकणारी जागा मिळाली तर त्याचा फायदा आघाडीला होऊ शकतो; त्यामुळे तशी जागा पक्षाला मिळावी असा प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नगर दक्षिण लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

डॉ. विखे यांचा दक्षिणेत शिबिराच्या माध्यमातून जनसंपर्क !
त्यामुळे साहजिकच पक्ष कोणता हे स्पष्ट न करताच निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र व युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुजय विखे हे कॉंग्रेसचे उमेदवार राहणार असल्याचे अनुकूल चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे. अर्थात, तसे संकेत मिळाल्यानंतर डॉ. विखे यांनी दक्षिणेत जनसंपर्क मोहीम शिबिराच्या माध्यमातून सुरू केल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादीच्या इच्छुकांची अडचण
नगर दक्षिण मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार असल्यास सध्या तरी पक्षात माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार दादा कळमकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुण कडू ही नावे चर्चेत आहेत, पण त्यापाठोपाठ युवा नेते प्रशांत गडाख व आमदार अरुण जगताप हे देखील इच्छुक पुढे आले आहेत.

अरुण कडू यांना लोकसभेच्या तयारीचे संकेत
विशेष म्हणजे सात्रळ येथील कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे यांनी अरुण कडू यांना लोकसभेच्या तयारीचे संकेत दिले. परंतु, पक्षाच्या राज्यपातळीवरील नेत्याने वेगळी भूमिका स्पष्ट केल्याने पक्षातील इच्छुकांची अडचणच होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.