नगरचे पासपोर्ट कार्यालय मार्चमध्ये सुरु होणार !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पासपोर्ट कार्यालय सुरु होण्याची नगर जिल्हावासीयांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. प्रधान डाकघरातील इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर प्रस्तावित असणारे हे कार्यालय येत्या मार्च मध्ये सुरु करण्याच्या हलचाली युध्दपातळीवर सुरु आहेत. याच संदर्भात पुणे पासपोर्ट कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नगर येथे नुकतीच भेट दिली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अत्याधुनिक शिक्षणाच्या कालखंडात उच्च शिक्षण घेऊन देशाबाहेर जाणाऱ्या नागरिकांची तसेच उद्योगाच्या विस्तारलेल्या कक्षामुळे कामानिमित्त, शिक्षणानिमित्त व व्यवसायानिमित्त देशाबाहेर जाणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. मागील दोन दशकांच्या काळात या संख्येचा आलेख वाढत गेला आहे. परदेशवारीसाठी पारपत्र अर्थात पासपोर्ट आवश्­यक असतो. जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट मिळवण्यासाठी पुणे प्रादेशिक पारपत्रक कार्यालयात जाण्याखेरीज अन्य मार्ग नाही.

यातून नागरिकांचा वेळ व पैसा अनाठायी खर्च होऊन, पारपत्र मिळवण्यासाठी हेलपाटे घालण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यातूनच जिल्हास्तरावर पासपोर्ट कार्यालय असावे, ही मागणी पुढे आली आहे. या संदर्भात निवेदनेही देण्यात आली. दरम्यान, केंद्रात सत्तारूढ झालेल्या वर्तमान भाजपच्याच सरकारने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हास्तरावर पासपोर्ट कार्यालयांना मंजुरी देण्यात येत असल्याचे घोषित केले. २०१६ मध्ये केंद्र सरकारने याबाबत घोषणा केली. राज्यातील अहमदनगरसह अन्य ठिकाणी नव्याने पासपोर्ट कार्यालये सुरू करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
२०१७ दरम्यान नगर येथे पासपोर्ट कार्यालयाच्या जागेच्या पाहणीसाठी तत्कालीन पुणे विभागाचे पारपत्र अधिकारी अतुल गोटसुर्वे, पुणे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्­वरकर यांनी नगर येथे संयुक्­तरीत्या भेट दिली. यावेळी प्रधान डाकघरच्या इमारतीचा दुसरा मजला हा पारपत्रक कार्यालयासाठी निश्­चित करण्यात आला. दरम्यान, २६ मे २०१७ रोजी पोस्टल सेवेच्या संचालक सुमित्रा आयोध्या यांनीही नगर येथे या संदर्भात भेट देऊन आढावा घेतला. या अनुषंगाने २१ जुलै २०१७ रोजी या कार्यालयातील इलेक्­ट्रीक व संगणक लॅनची फिटींग करण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयातून मंजुरी आली मात्र, होणार-होणार म्हणून ज्या पासपोर्ट कार्यालयाची वाट जिल्ह्यातील नागरिक पाहत आहेत. त्याची अजून नागरिकांना प्रतीक्षाच आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.