अवैध वाळू उपसा प्रकरणी दोन तलाठ्यांचे निलंबन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व मांडवे बुद्रुक परिसरातील मुळा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याने त्याबाबत वारंवार सूचना देऊनही कारवाई न केल्याने खंदरमाळचे कामगार तलाठी बाळकृष्ण सावळे व मांडवे बुद्रकचे तलाठी रामदास मुळे यांचे निलंबन करण्यात आले असून नांदूर गावचे पोलिस पाटील किसन सुपेकर व जांबुत बुद्रुकचे पोलिस पाटील गंगाधर शिरसाठ या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे. त्यामुळे संगमनेरसह नगर जिल्ह्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत माहिती अशी की, नांदूर खंदरमाळ परिसरातील मुळा नदी काठी असलेल्या क्षेत्रातील जमिनीच्या मातीखाली मोठ्या प्रमाणात वाळू असल्याचे दिसले. त्या ठिकाणी पाहणी केली असता ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळूचे ढिग आढळून आले व वाळूचे उत्खनन होऊन मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर वाहनांच्या टायरच्या खुणा, फावडे, घमेले व वाळूचे चाळण्या असे साहित्य त्या ठिकाणी आढळून आले.

त्यामुळे यावरुन याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच गट नं. ५८४ मध्ये ३५ ब्रास, गट नं. ५८० मध्ये २९५ ब्रास, गट नं. ५८४ व गट नं. ८५८ मध्ये १६५३ ब्रास वाळू याप्रमाणे खासगी मालकांच्या क्षेत्रातून वाळू उत्खनन झाले असल्याचे आढळून आले आहे. त्या व्यतिरिक्त त्याच परिसरात मुळा प्रकल्पासाठी भूसंपादीत झालेल्या शासकीय क्षेत्रावरही एकूण सहा वेगवेगळ्या ठिकाणी वाळूचे उत्खनन झाले आहे. एकूण ३५८४ ब्रास वाळूचे उत्खनन झाले आहे. यापुर्वी याच हद्दीत तहसिलदार साहेबराव सोनवणे, उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे यांच्या पथकाने वेळोवेळी मोठ्या प्रमाणात कारवाया करुन गुन्हे दाखल करत दंडही केलेले आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तलाठी सावळे यांच्या कार्यक्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची तस्करी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. कामगार तलाठी वाळू बाबत कुठलीही माहिती वरिष्ठांना देत नसल्याबाबत निदर्शनास आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून अनधिकृत गौण खनिज वाहनांवर कारवाई करण्याबाबत कडक निर्देश असतानासुद्धा तलाठी यांनी वाहनांची कोणतीही माहिती न देता त्यांना पाठिशी घातले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर कामगार पोलिस पाटील किसन पंढरीनाथ सुपेकर यांनी गावातील गौण खनिजांचे जतन न करता याबाबत हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे तलाठी साळवे यांचे निलंबन तर पोलिस पाटील सुपेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.