बसस्थानकावर चोरी करणाऱ्या महिलांना रंगेहाथ पकडले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्रवासी महिलेच्या गळ्यातील पन्नास हजाराचे दागीने ओरबाडुन धुम ठोकणाऱ्या दोन महिलांना शिर्डी पोलीसांनी रंगेहाथ पकडले आहे. प्रवाशी महिलेस आपले दागीने सहिसलामत मिळाल्याने या महिलेने पोलीसात तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे दागीने चोरणाऱ्या महिलांवर केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत अधिक माहीती अशी की, शिर्डी बसस्थानकाहुन काल शनिवारी सकाळी सुवर्णा नितीन लोखंडे ही महिला बस मधुन प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी प्रवाशी महिलेल्या गळ्यातील दागीने ओरबाडुन गळ्यातील पर्स चोरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. सदर बाब महिलेच्या लक्षात आली. या महिलेने शिर्डी स्थानक प्रमुख टी.बी. जगताप यांना लागलीच महिती दिली.

त्यांनी याची माहीती शिर्डी पोलीसांना दिली असता पो.नि. प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक संदीप कहाळे, पो.हे.कॉ. मंडलिक, पो.ना.किरण कुऱ्हे यांनी आरोपी महिलांचा शिर्डी बसस्थानकात शोध घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यांची महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडुन चौकशी केली असता आपले नाव-गाव सांगितले. शोभा प्रताप खंदारे (वय ४५) व सुनिता सुनिल साकेत (वय ४०) दोघीही रा.श्रीरामपूर. त्यांच्याकडुन एक सोन्याचे लॉकेट आणी रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आला. त्यानुसार तक्रारदार महिलेला मुद्देमाल तात्काळ परत केला. मात्र सदर महिलांच्या विरोधात तक्रारदार महिलेने फिर्याद देण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर सी.आर.पी.सी.१०९ नुसार कारवाई करण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.