नगर जिल्ह्याचे विभाजन करताना कोपरगाव हाच नवीन जिल्हा करावा - आ.कोल्हे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : नव्या जिल्ह्यासाठी आवश्यक असणारी भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय स्थिती, रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग, दळणवळणाची सोय, देशाचे मध्यवर्ती ठिकाण, अशी सर्वसंपन्न पार्श्वभूमी असल्याने कोपरगावच जिल्हा करावा, अशी मागणी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पत्रकात म्हटले की, आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या श्री साईबाबांची शिर्डी, कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळ, नव्याने होत असलेला नागपूर- मुंबई आठपदरी समृद्धी महामार्ग, संपूर्ण देशाला सर्व दिशांना मध्यवर्ती स्थान असलेला मालेगाव- पाटस चारपदरी महामार्ग व दुहेरी रेल्वेमार्ग सूरत- शिर्डी, चारपदरी महामार्ग नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग, आंतरराष्ट्रीय तीर्थस्थानी विविध एैतिहासिक स्थळे असलेल्या नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव, आदींना समान अंतरावर असलेल्या कोपरगावलाच शासनाने नवीन जिल्हा म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कोपरगावला एैतिहासिक, धार्मिक पौराणिक वारसा असून गुरू शुक्राचार्य प्रति त्र्यंबकेश्वर समजले जाणारे कचेश्वर देवस्थान रामायण काळाचे संदर्भ असलेली विविध एैतिहासिक स्थळे येथे आहेत. नाशिक, अहमदनगर, आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांना जोडणारा व दळणवळणाच्या दृष्टीने कोपरगाव हेच जिल्ह्याचे मुख्यालय सोयीचे तसेच १०० किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटन व धार्मिक स्थळांच्या जिल्हा मुख्यालयाच्या सर्व शासकीय कार्यालयासाठी लागणारी जागा कोपरगाव येथेच उपलब्ध आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शिवाय याठिकाणी उच्च दर्जाचे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अद्ययावत शिक्षणाची महाविद्यालये, अभियांत्रिकी तांत्रिक पदवी पदव्युत्तर तसेच शिक्षणशास्त्र व्यवस्थापन शास्त्र सैनिकी सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र व सर्व सोयीनियुक्त शिक्षण संस्था महाविद्यालये तसेच आरोग्य सुविधा आहेत. त्यामुळे शासनाच्या अब्जावधी रूपये खर्चात बचत होणार आहे. जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक सुविधा व तसे बांधकाम येथे उपलब्ध आहे. 

कोपरगाव भागात देशभरातून हजारो वाहनांच्या माध्यमातून लाखो नागरिक प्रवास करतात. या परिसरात व्यापाराची मोठी उलाढाल त्या माध्यमातून होते. देशांतर्गत महत्वाच्या असणाऱ्या स्थानांना जोडण्यासाठीच्या सर्व दळणवळणाच्या रेल्वे, विमान सेवा, रस्ते, सुविधा कोपरगाव येथेच असल्याने शासनाने नगर जिल्ह्याचे विभाजन करताना कोपरगाव हाच नवीन जिल्हा करावा, असेही आमदार कोल्हे यांनी म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.