नगर-जामखेड रोडवरील अपघातात तीन जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : नगर - जामखेड रोडवरील दशमीगवान शिवारात शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप ट्रकच्या मागच्या बाजूस जाऊन आदळला. या वेळी झालेल्या अपघातात तीनजण जखमी झाले असून, त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत स्थानिक नागरिकांकडून समजलेल्या माहितीनुसार- एमएम12 -एनएक्स- ०९५३ ही पिकअप जामखेडकडून नगरकडे जात होती. दशमीगवान शिवारात या पिकअपने नगरकडून जामखेडच्या दिशेने चाललेल्या मालवाहू ट्रक क्र. एपी २९- 7612 या ट्रकला जोराची धडक दिल्याने ट्रक पलटी झाली. या वेळी तीनजण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात पिकअपचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातग्रस्तांना स्थानिक नागरिकांनी मदत करून रुग्णालयात पाठवले. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत अपघाताची नोंद झाली नव्हती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.