मी आश्वासने देत नाही, प्रत्यक्ष कामावर माझा भर - आमदार राहुलदादा जगताप

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : सर्वांचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करतच आहे. मी आश्वासने देत नाही. प्रत्यक्ष कामावर माझा भर आहे. यापुढे ही श्रीगोंदे व नगर तालुक्यातील विकास कामांसाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. या रस्त्यांच्या कामासाठी येथील ग्रामस्थांनी मागणी केलेली होती. मी इतरांप्रमाणे नुसत्याच कोटींच्या गप्पा मारत नाही, तर प्रत्यक्ष कामे मंजूर झाल्यावरच बोलतो. त्यामुळे श्रीगोंदे तालुक्यातील रस्ते दर्जेदार होतील, अशी माहिती आमदार राहुल जगताप यांनी दिली.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना वित्तीय वर्ष सन २०१७-१८ बॅच २ अंतर्गत रस्त्यांसाठी श्रीगोंदे-नगर मतदारसंघातील रस्त्यांसाठी २२ कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला. पुढील ५ वर्षांसाठी या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी २.०० कोटींचा अतिरिक्त निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.
जगताप म्हणाले, या रस्त्यांत श्रीगोंदे तालुक्यातील प्रजिमा ६१ ते ढवळेवाडी टाकळी लोणार ते कोसेगव्हाण रस्त्यासाठी ३४९.५५ लाख, पारगाव ते वडाळी भानगाव रस्त्यासाठी ३८६.५७ लाख, राजापूर ते शेळकेवाडी तालुका बॉर्डर रस्त्यासाठी २६२.७६ लाख, राजापूर कवाष्टे मळा कोल्हेवाडी ३९८.९३ लाख, सांगवी दुमाला रस्त्यासाठी २९८.५१ लाख, नगर तालुक्यातील बारदरी ते महालदरा खांडके रस्त्यासाठी २३९.२६ लाख, रतडगांव रस्त्यासाठी २६२.२६ लाख असे श्रीगोंदे - नगर तालुक्यातील एकुण ३४ कि. मी. साठी २२ कोटींचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे.

या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश होण्यासाठी प्रस्ताव दाखल करून वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत शासनाने या कामांना मंजुरी दिलेली आहे. जगताप म्हणाले, तालुक्यातील सर्व गावे चांगल्या पक्क्या रस्त्यांनी जोडण्याचा माझा मानस आहे. गेली ३० ते ३५ वर्षे जे रस्ते पक्के झाले नाहीत ते आता करण्याचे काम मी करत आहे. यामध्ये श्रीगोंदे तालुक्यातील २७ कि. मी. व नगर तालुक्यातील ७ कि. मी. रस्ते पक्के होणार आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यासाठी २२.०० कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. तालुक्यातील रस्त्यांचे जाळे भक्कम झाले आहे. रस्ते हा विकासाचा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे सर्वांचा विकास होण्यास मदत होते. रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करत आहे, असल्याची माहिती आमदार राहुल जगताप यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.