जनतेचे कैवारी म्हणवणाऱ्यांचे संस्था व उद्योग टिकवण्यासाठीच राजकारण

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : स्वत:ला जनतेचे कैवारी म्हणवणाऱ्यांनी आपल्या संस्था, कारखाने, उद्योग टिकवण्यासाठीच राजकारण केले. त्यांनी तालुक्याला काय दिले? असा सवाल आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केला.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तालुक्यातील गिडेगाव येथे गिडेगाव ते गोगलगाव रस्ता भूमिपूजन व चौदाव्या वित्त आयोगातील बंदिस्त गटार, प्राथमिक शाळेतील पाणी पुरवठा पाइपलाइन, अंगणवाडीसमोर पेव्हिंग ब्लाॅक, ग्रामपंचायत कार्यालय वाॅल कम्पाउंड आदी कामांचे लोकार्पण भास्करगिरी महाराज, आमदार मुरकुटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आमदार मुरकुटे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुरुषोत्तम सर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नवनाथ साळुंके, वसंतराव देशमुख आदी उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आमदार मुरकुटे म्हणाले, निधी मिळवणे व त्याचे समाजात योग्य पद्धतीने कामे करणे हे माझे काम आहे. ते मी प्रामाणिकपणे करतो. लोकप्रतिनिधी या नात्याने विकासकामे करण्यासाठी मी जनतेशी बांधिल आहे व त्यामुळे माझा होत असलेला गौरव हा अमृत महोत्सवापेक्षा मोठा आहे. तीन वर्षांपूर्वी परिवर्तन घडले. विकासाला गती मिळाली, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.