माझ्यावर आरोप करणाऱ्यांचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांनाच माहित - माजीमंत्री पिचड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापयंर्त लढा देणार असुन सध्याचे सरकार आदिवासी व शेतकरी विरोधी असुन 'ईडा पिडा टळो व बळीचे राज्य येवो' म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी शरदचंद्र पवार यांचे सरकार येवो, असे प्रतिपादन माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राजकिय आकसापोटी माझ्यावर खालच्या थरावर जाऊन आरोप करणाऱ्यांचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांनाच माहित आहे. धनगरांना आदिवासी समाजाच्या आरक्षणात घेण्याला विरोध करणारा मी एकमेव असल्याने हे सरकार आपल्यातल्याच काहींना बरोबर घेऊन व्यक्तीगत बदनामी करून लक्ष विचलीत करू पहात आहेत. अकोले तालुक्यातील राजुर येथील आदिवासी उन्नतीच्या सभागृहात पार पडलेल्या आदिवासी समाजाच्या मेळावा व हल्लाबोल कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीच्या वेळी पिचड बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर नवले,मंगलदास भवारी,भरत घाणे,उपसरपंच गोकुळ कानकाटे,माजी सरपंच संतोष बनसोडे,सी.बी.भांगरे,राजु कानकाटे,राजेंद्र डावरे,विजय भांगरे,जयराम इदे,पुष्पाताई भांगरे,दौलत देशमुख,शशिकांत देशमुख,यशवंत पोटकुले,अविनाश बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पिचड म्हणाले, टाटाचा अहवाल लवकरच येणार आहे. हा अहवाल आदिवासी विरोधात गेला तर आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाची घुसखोरी होईल. त्यामुळे सर्व आदिवासी समाजाने एकत्रित येत लढा देण्याची गरज आहे. सध्याचे सरकार आंधळे व बहिरे असुन त्यांना शेतकर्यांच्या व्यथा,बेरोजगारी व आदिवासी समाजाची जगण्याची धडपड दिसत नाही. त्यामुळे येत्या १६ तारखेला या सरकारला जाब विचारण्यासाठी हल्लाबोल आंदोलनाला उपस्थित रहा, असे आवाहन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.