श्रीगोंद्यात सराफ व्यावसायिकास १२ लाखाला लुटले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील सोन्या-चांदीचे व्यापारी पंकज डहाळे यांना मंगळवारी (३० जानेवारी) रात्री आठच्या सुमारास ते दुकान बंद करून शिरूरला जात असताना देवदैठण-शिरूर रस्त्यावरील पेट्रोलपंपाच्या पुढे राजापूर फाट्यानजीक चार चोरट्यांनी डोळयात मिरचीची पूड टाकून डहाळे यांच्याकडील तब्बल ११ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे डहाळे यांच्या मालकीचे रेणुका ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. डहाळे हे शिरूर या ठिकाणी राहत असून दररोज दुकान बंद केल्यावर दुकानांमधील सर्व ज्वेलरी ते आपल्यासोबत नियमित घरी घेऊन जात होते.

नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करण्याच्या अगोदर दुकानातील सर्व दाग-दागिने आपल्या जवळील बॅगेत भरून दुकान बंद करून ते घरी जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले. देवदैठण येथून ते शिरूरकडे जात असताना राजापूर फाट्यानजीक ते आले असता पाठीमागून दोन दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी डहाळे यांच्या दुचाकीला मागून धक्का देऊन त्यांना खाली पाडले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
ते खाली पडले असता त्यातील एकाने त्यांच्या डोळयात मिरचीची पूड टाकली तर बाकीच्या तीन इसमांनी त्यांच्या जवळील दागिन्याने भरलेली बॅग हिसकावली आणि पळ काढला. त्या बॅगमध्ये कानातील टॉप, चैन, मंगळसूत्र, डोरले,अंगठ्या, बाळी, कोर्ते असे मिळून तब्बल ८ लाख ८८ हजाराचे सोन्याचे तर चांदीचे जोडवे पट्ट्या व इतर असे २ लाख ८७ हजार रुपये किंमतीचे दीड किलो चांदीचे दागिने असा जवळपास पावणे बारा लाख रुपये किंमतीचा ऐवज होता. 

तो ऐवज चोरून चोरटे पसार झाले. त्यानंतर रात्री उशिरा डहाळे यांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ हे करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.