आमदार आदर्शग्राम योजना बारगळली !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आमदार आदर्शग्राम योजनेच्या आधारावर ग्रामविकास विभागाने ही योजना सुरू केली. या योजनेत सहभागी झालेल्या गावांची तालुका व जिल्हा स्तरावरील समितीने तपासणी करून जिल्ह्यातील मतदारसंघातील पंधरा गावांच्या निवडी केल्या असल्या तरी कागदपत्रांच्या त्रुटीमुळे अद्यापि एकही प्रस्ताव दाखल नाही. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
प्रशासनानेही लवकरात-लवकर प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहे. प्रस्ताव दाखल होत नसल्याने आमदार आदर्शग्राम योजनेतील अडचणी वाढल्या असून, त्यातच एकही काम सुरू न झाल्याने योजना पुरती बारगळली आहे.

आमदार आदर्शग्राम योजनेचे आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील मतदार संघातील 15 गावे निवडली आहेत. या योजनेला कोणत्याही विशेष निधीची तरतूद नसते. या निवडलेल्या आदर्शग्राम योजनंतील गावांची चार्ज अधिकारी पाहणी करून गाव आदर्श होण्यासाठी या गावात काय विकास केला पाहिजे, त्या आधारावर शासनाच्या सर्व योजनातून या गावांसाठी कामे केली जातात. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यासाठी प्रशासनाने आदर्श ग्राम योजनेतील प्रस्ताव लवकरात-लवकर दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहे. परंतु, चार्ज अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी निर्माण होत असून, त्यातच संबंधित तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींची यात संमती घेतली जाते. अशा अनेक अडचणींमुळे आमदार आदर्शग्राम योजना पुरती बारगळली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.