मेटाकुटीला आलेल्या मनपाला आता महावितरणनेही दिला दणका !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महावितरणने विजेच्या थकबाकीपोटी महानगरपालिकेच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा बुधवारी खंडित केल्याने शहरात अंधार पसरला आहे. आर्थिक मेटाकुटीला आलेल्या मनपाला आता महावितरणनेही दणका दिल्याने मनपासमोरील अडचणी वाढल्या आहेत. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
महावितरणची सुमारे ११ कोटींची थकबाकी महापालिकेकडे आहे. यापूर्वीही महावितरणने मनपाच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यावेळी काही रकमेचा भरणा करून हा पुरवठा सुरू करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित झाल्याने शहर अंधारात आहे. दोन दिवसांपूर्वी मनपाने पाणीपुरवठा योजनेच्या थकबाकीपोटी सुमारे १ कोटी ४४ लाखांचा भरणा केल्याने मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.