जिल्ह्यातील चारा छावण्याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 2012 ते 14 या कालावधीत सुरू करण्यात आलेल्या जिल्ह्यातील 426 चारा छावण्यांत अनियमितता आढळून आली होती. चाराछावण्या चालविणाऱ्या 271 संस्थांवर गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या आदेशानंतर प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. आज मंबुई उच्च न्यायालयात कारवाईचा अहवाल प्रशासनाने सादर केला असून, पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी होणार आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
गुन्हे दाखल झालेल्या संस्थांमध्ये श्रीगोंदे तालुक्‍यातील 81, नगर- 66, पाथर्डी- 22, कर्जत-70 आणि नेवासे तालुक्‍यातील 9 संस्थांचा समावेश आहे. भारतीय दंडविधान 1860 मधील कलम 188 नुसार हे गुन्हे नोंदविले जात आहेत. या कारवाईविरोधात यापूर्वीच 69 संस्थाचालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. यात शेवगाव तालुक्‍यातील 30, कर्जत- दोन, जामखेड- सहा, पाथर्डी- 15, नगर- 12, तसेच पारनेर तालुक्‍यातील तीन संस्थांचा समावेश आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अनियमितता आढळून आल्यावर या छावण्या चालविणाऱ्या संस्थांची तपासणी करण्यात आली. त्यात अनेक ठिकाणी अनियमितता आढळली. या पाचही जिल्ह्यांत चाराछावण्या चालविणाऱ्या संस्थांविरोधात केलेल्या दंडात्मक कारवाईत सुमारे सात कोटी 92 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. चारा छावण्या चालविणाऱ्या 426 संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 63 लाख 66 हजार 885 रुपयांचा दंड प्रशासनाने या संस्थांकडून वसूल केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.