शिर्डी साई संस्थानकडून घोटाळा दाबून ठेवण्याचा प्रयत्न ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबा समाधी शताब्धी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर साईबाबा संस्थान अध्यात्मिकदृष्ट्या चर्चेत येण्याऐवजी घोटाळे, सोयीसुविधांचा बोजवारा यामध्येच चर्चिले जात आहे. साईबाबा संस्थानच्या तूप खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे लोकप्रतिनिधी सांगत असतानाही घोटाळ्याचा वास बाहेर जाऊ न देता दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संस्थान एक प्रकारे घोटाळेबाजांची पाठराखण करते की काय? असा सवाल साईभक्‍त उपस्थित करत आहेत.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
साईसमाधी शताब्दी महोत्सवासाठी शासनाने साईबाबा संस्थान प्रशासनावर जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक यासह विविध विभागाचे अधिकारी प्रतिनियुक्‍तीवर नेमले आहे. मात्र या अधिकाऱ्यांकडून पाहिजे तसा भक्‍तभिमुक बदल दिसत नाही. त्यामुळे भक्‍तांमध्ये काहीसा नाराजीचा सूर दिसून येतो. इतर विभागाचे अधिकारी येथे नियुक्‍त केलेले असताना अन्न व औषध प्रशासनाचा अधिकारी संस्थानवर का नियुक्‍त केला जात नाही? हा मोठा संशोधनाचा विषय आहे.

प्रतिदिनी हजारो साईभक्‍तांना महाप्रसाद, बुंदी लाडूचा प्रसाद दिला जातो. याची तसेच खाद्य पदार्थासाठी कोट्यवधी रुपयांचा माल, तर रुग्णालयासाठी औषधे खरेदी केली जातात. याचा दर्जा, गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न औषध प्रशासनाचा कायमस्वरूपी अधिकारी साईबाबा संस्थानकडे असणे गरजेचे आहे. परंतु संस्थानला त्याची गरज का भासत नाही? संबंधित दर्जाचा अधिकारी नसल्यानेच तुपाचा वास वेगळाच येऊ लागला आहे. तुपाच्या दर्जाला व गुणवत्तेला “आर्थिक वास’ येत असल्याची चर्चा आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तूप खरेदीत आर्थिक होत असल्याची जाहीर वाच्च्यता ठेकेदारांकडून होत आहे. तुपाच्या या भ्रष्ट खरेदीला लगाम लागावा म्हणून लोकप्रतिनिधींनी तूप खरेदीची सीबीआय चौकशीची मागणी शासनाकडे करीत आहेत. तुपाच्या खरेदीला आर्थिक घोटाळ्याबरोबरच राजकीय हस्तक्षेप व वास येऊ लागल्याने या प्रकरणाचा पाठपुरावा थंडावला की काय? असा संशय वाटू लागला आहे. 

दर्जेदार व शुद्ध तूप वापरले जावे ? याकरिता अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली संबंधित खरेदी होणे गरजेचे आहे. त्यात दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करता येईल. संस्थानने फक्‍त ठेकेदाराकडून मालाचा नमुना घेऊन प्रयोग शाळेतून तपासून तो उच्च दर्जाचा असल्याचा अहवाल प्राप्त करून घेत माल खरेदी करायचा. 

मात्र प्रयोगशाळेत तपासण्यासाठी दिला जाणारा माल व प्रत्यक्षात दिला जाणाऱ्या मालामध्ये मोठी तफावत असते. परिणामी सर्वच पदार्थांचा दर्जा अपवादात्मक अनेकदा घसरतो. असे वारंवार होत असल्याने साईभक्‍तांमध्ये नाराजी वाढत आहे.देशासह राज्यात अनेक नामांकित कंपन्या असतांना खरेदीबाबत अनेकदा मर्जीतीलच किंवा मर्जी सांभाळणाऱ्या ठेकेदारांनाच ऑर्डर दिली जात असल्याचे यापूर्वीही आरोप झाले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.