श्रीरामपूर येथील चार सराईत गुन्हेगारांवर मोक्‍कांतर्गत कारवाई.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर येथील चार सराईत गुन्हेगारांविरूद्ध मोक्‍कांतर्गत कारवाईच्या प्रस्तावाला नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मंजुरी दिली. या गुन्हेगारांविरूद्ध श्रीरामपूर शहर, कोपरगाव, लोणी, राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे दाखल आहेत.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत अधिक असे, 28 ऑगस्ट 2017 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बाभळेश्‍वर-श्रीरामपूर रस्त्यावर जबरी चोरी झाल्याची माहिती रात्र गस्तीवर असलेल्या लोणी पोलिसांना मिळताच त्यांनी आरोपींना शोधण्याची मोहीम हाती घेतली. त्यानुसार आरोपी तौफीक सत्तार शेख (वय 31, रा. श्रीरामपूर), राहुल विलास शेंडगे (वय 19, रा. अशोकनगर, श्रीरामपूर), गौरव रवींद्र बागूल, किरण सुरेश कांबळे, विशाल बबन शेजवळ, मुनशून उर्फ साजीद खालीद मलिक (सर्व रा. श्रीरामपूर) यांनी दोन मोटारसायकलवर येऊन त्यातील तौफीक सत्तार शेख, राहुल विलास शेंडगे, गौरव रवींद्र बागूल या तीन आरोपींनी पाठलाग करीत असलेल्या पोलिसांच्या अंगावर मोटारसायकल घातली. गौरव रवींद्र बागूल याने त्याच्या हातातील गावठी कट्ट्यातून गोळीबार करून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गुन्हेगारांच्या दिशेने गोळीबार केला होता. या आरोपींना नगर-मनमाड रस्त्यावर पिंपरी निर्मळ शिवारातील टोलनाक्‍यावर अडवून ताब्यात घेतले गेले. आरोपींनी लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री तीन गुन्हे व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
श्रीरामपूर शहर, कोपरगाव, लोणी, राहाता या पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न करणे, दंगा, बेकायदा जमाव जमवून गुन्हे करणे, जबरी चोरी, दरोडा, गुन्हे करताना शस्त्रांचा वापर करणे, शस्त्राचा धाक दाखवून मोटारसायकल चोरून फिर्यादी व साक्षीदार यांना जखमी करणे, त्यांच्याकडील ऐवज चोरून पोबारा करणे तसेच पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणे, आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे या आरोपींविरुध्द दाखल आहे.
तौफीक सत्तार शेख, राहुल विलास शेंडगे, गौरव रवींद्र बागूल, मुनशून उर्फ साजीद खालीद मलिक (सर्व रा. श्रीरामपूर) या चार आरोपींविरुध्द लोणी पोलिसांनी नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मोक्‍कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविला होता; त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.