श्रीगोंद्यात पहिलीच्या दोन विद्यार्थिनींना शिक्षकाकडून मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिली इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलींना फक्त पुस्तक वाचता येत नसल्याच्या कारणावरून. त्या शाळेच्या एका शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याचा घटना काल दि. ८ रोजी घडली आहे.  

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत माहिती अशी की तालुक्यातील एका गावात पहिली इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींना पुस्तक वाचता न आल्याने शिक्षकाने या दोन चिमुरड्या विद्यार्थिंनिना पाठीवर वळ उठेपर्यंत अमानुष मारहाण केली. शाळा सुटून मुली घरी गेल्यावर त्यांनी घरच्यांना हा प्रकार सांगितला. यातील एका मुलीला जास्त मार लागल्यामुळे तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते. दरम्यान या प्रकाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.