वाहनाच्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवार तसेच नगर-जामखेड मार्गावरील निंबोडी शिवारात दुचाकीला वाहनांची धडक बसून दोघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कामरगाव शिवारात नगरहून पुणे रोडने चाललेले विजय राजाराम लोंढे (वय ४५, रा. हंगा, ता. पारनेर) यांना कामरगाव शिवारातील हॉटेल सुवर्णज्योतजवळ मागून आलेल्या टेम्पो कंटेनरने (क्र. एमआर ३८ डब्ल्यू ८६४७) जोराची धडक दिली. यात विजय लोंढे हे जागीच ठार झाले. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला. याप्रकरणी नगर पोलिस ठाण्यात सागर विजय लोंढे (वय २४) यांच्या फिर्यादीवरुन टेम्पो चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तर दुसऱ्या घटनेत नगर-जामखेड रोडवरील निंबोडी शिवारात नगरहून जामखेडच्या दिशेने चाललेला जेसीबी (क्र. युपी १६ बीटी ७३८९) निंबोडी शिवारातील एका हॉटेलसमोर आल्यानंतर समोरुन येणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच २३ व्ही ५२९) जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील जालिंदर रामभाऊ एकशिंगे हे गंभीर जखमी झाले व उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. जेसीबी चालक फरार झाला. याप्रकरणी आजिनाथ केशव जंजीरे यांच्या फिर्यादीवरुन जेसीबी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.