कोपरगावात ३० हजाराची लाच घेताना निरीक्षकासह लिपिकास अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्यातील येसगाव स्वामी समर्थ पेट्रोल पंपावर नोझल तपासणी करण्यासाठी तक्रारदार पेट्रोल पंप व्यवस्थापकाकडून ३० हजार रूपयांची लाच घेताना कोपरगाव वजन व मापे निरीक्षक व लिपीक या दोघांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तक्रारदार यांनी ६ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात याविषयी तक्रार नोंदविली होती. आरोपींच्या मागणीनुसार काल येसगाव स्वामी समर्थ पेट्रोल पंपावर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी निरिक्षक अशोक घुगे व लिपीक संतोष लोखंडे यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेचे तीस हजार रुपये घेतले. ही रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
वजन व मापे निरीक्षक अशोक रंगनाथ घुगे (वय ४४) आणि लिपीक संतोष तुकाराम लोखंडे (वय ४६)अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, दिपक कुशारे, साधना खैरनार, चंद्रशेखर मोरे, वसंत दाभोळे यांच्या पथकाने गुरूवारी सायंकाळी ही कारवाई केली..

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.