साईबाबा संस्थानला वर्षभरात २८८ कोटींचे दान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबा संस्थानला सन २०१७ या वर्षभराच्या कालावधीत सुमारे २८८ कोटी रुपयांचे भरभरुन दान आले आहे. याशिवाय २४ किलो सोने व ३८५ किलो चांदी बाबांच्या चरणी प्राप्त झाली आहे. बाबांच्या दानात दिवसेंदिवस वाढ होत असुन साईसंस्थान या पैशांतुन माफक दरात रुग्णालय, शैक्षणिक संकुल,प्रसाद भोजन, दर्शन रांगेत चहा-कॉफी, बिस्कीट,बससेवा आदी सुविधा देत आहेत.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
साईबाबा संस्थानची स्थापना झाली त्यावेळी संस्थानचे केवळ दोन हजार तिनश रुपये एवढे उत्पन्न होते. साईबाबांची महती सातासमद्रापलिकडे पोहोचली असुन साईदरबारी भक्तांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे.सन २०१७ साली साईदर्शनासाठी आलेल्या भक्तांनी बाबांना सुमारे २८८ कोटी रुपये तसेच २४ किलो सोने आणि ३८५ किलो चांदीचे दान केले आहे. उत्सव व सलग सुट्ट्यांच्या दरम्यान बाबांना जमा होणारे दान पुर्वीचे उच्चांक मोडीत काढत आहे.

साईसंस्थानकडे आता २१०० कोटींची गंगाजळी तसेच चारशे किलो सोने, साडे चार हजार किलो चांदी जमा आहे. साईबाबा संस्थानचे वार्षिक उत्पन्न साधारणत: ४०० कोटी रुपये असले तरी यातील पन्नास टक्के रक्कम कर्मचाऱ्यांचे पगार व भक्तांना दिल्या जाणाऱ्या सुविधासांठी खर्च होते..
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
साईबाबा संस्थान दर्शनासाठी आलेल्या भक्तांना सुलभतेने दर्शन व्हावे यासाठी नियोजन करत असते. गर्दीच्या काळात भक्तनिवासाशिवाय मंडप,निवास व्यवस्था आदी अतिरिक्त सुविधा पुरवत असते. संस्थानच्या माध्यमातुन एक रुग्णालय मोफत, दुसरे रुग्णालय माफत दरात, मोफत भोजन प्रसाद, अल्पदरात भक्तनिवास, दर्शन रांगेत मोफत चहा,नास्ता, बिस्किटे, बंुदी पाकीट आदी सुविधा पुरवत आहे. याशिवाय शिर्डी नगरपंचायतला शहराच्या विविध विकासकामांत भरीव आर्थिक मदत करत असते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.