कुकडी, घोड, विसापूरचे आवर्तन सोडा : माजीमंत्री पाचपुते.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कुकडी, घोड व विसापूरचे आवर्तन सोडण्याकरिता लाभक्षेत्राखालील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार माजी मंत्री बबनराव पाचपुते. यांनी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन,पालकमंत्री ना.राम शिंदे यांना दि.७ रोजी पत्रव्यवहार करून आवर्तन सोडणेची मागणी केली. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पाचपुते यांनी पत्रात म्हटले की, लाभधारक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू,कांदा, मका,हरभरा, इत्यादी पिकांसह इतरही काही चारापिके केलेली आहेत. या उभ्या असलेल्या पिकांना वेळेवर पाणी मिळणेसाठी कुकडी प्रकल्प व विसापूर धरणातून रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन दि.२० फेबु.२०१८ च्या दरम्यान तसेच घोड धरणातून दुसरे आवर्तन दि.२८ फेबु. २०१८ च्या दरम्यान सोडण्यात यावे. अशी मागणी केलेली आहे. 

पाचपुते पुढे म्हणाले की, आवर्तन लवकर सोडणे गरजेचे असूनही, सदर तारखेपर्यंत आवर्तन सोडणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वी झालेल्या कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये कुकडी प्रकल्पातून चार रोटेशन देण्याचे ठरले असून. त्यापैकी एक रोटेशन पूर्ण झालेले आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आणखी तीन रोटेशन बाकी असून, सद्यस्थितीत २० तारखेपर्यंत दुसरे आवर्तन सोडणे गरजेचे आहे. तिसरे आवर्तन एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस व चौथे आवर्तन २० मे च्या दरम्यान सोडावे. असा निर्णय झालेला असताना त्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत पाचपुते यांनी व्यक्त केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.