माजीमंत्री पिचड यांच्या बेहिशेबी मालमत्तेची ईडीमार्फत चौकशी करा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जन्माने आदिवासी नसलेल्या महिलेचे लग्नानंतर आदिवासी असल्याचा खोटा दाखला मिळवून आदिवासी समाजातील लोकांच्या जमिनी बेकायदेशीरपणे हडप करून फसवणूक केली आहे. या बोगस आदिवासीची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने अधिक असलेल्या बेहिशेबी मालमत्तेची सक्त वसुली संचालनालय (ईडी) यांच्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी पत्रकार परिषदेत केली. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. लहामटे बोलत होते. पत्रकारांनी डॉ. लहामटे यांच्याकडे पिचड यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी ते पत्रकारांना पत्रकार परिषदेत दाखवले नाहीत. ती कागदपत्रे मी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे तक्रारी सोबत दाखल केली असल्याचे सांगितले. 

पत्रकार परिषदेस भाजपचे जिल्हा परिषदेतील गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, भाऊसाहेब वाकचौरे, अमर मुरूमकर आदी उपस्थित होते. पिचड यांनी सत्तेचा व आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून आदिवासी समाजात बोगस आदिवासींची घुसखोरी करण्यास काही लोकांना मदत केल्याचेही सांगितले. 

पिचडांनी आपल्या स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावावर दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, सुगाव परिसरात कोट्यवधी रुपयांची संपत्ती करून ठेवली असल्याने या सर्व ठिकाणच्या बेहिशोबी मालमत्तेची सक्तवसुली संचालनामार्फत चौकशी करण्याची मागणीही डॉ. लहामटे यांनी यावेळी केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पिचड यांनी बिगर आदिवासी पत्नीला भिवंडीतून हिंदू महादेव कोळी या जातीचा खोटा दाखला मिळवून दिल्याचे सांगितले. आमदार मुलाचे शिक्षण जिल्हा परिषद निवडणुकीत १२ वी व नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत १० वी असे दाखवले असल्याचा दावा करीत शिक्षणाच्या फेर बदलामुळे आमदारांचे शिक्षण किती समजायचे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.