संगमनेरकरांचे नेतृत्व पोहचले दिल्ली दरबारी ! आ.थोरात यांची काँग्रेसच्या मसुदा समितीवर निवड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माजी मंत्री व विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांची बुधवारी केंद्रीय पातळीवर महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कॉंग्रेसच्या मसुदा समितीवर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवड केली आहे. या शिवाय अन्य काही समित्यांमध्ये ही थोरात यांचा समावेश झाल्याने संगमनेरकरांचे नेतृत्व थेट दिल्ली दरबारी पोहचले आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राहूल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कॉंग्रेसच्या होऊ घातलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे लोकप्रिय नेते बाळासाहेब थोरात यांची विविध राष्ट्रीय समित्यांवर निवड करण्यात आल्याची माहिती पक्षाचे जनरल सेक्रेटरी जनार्दन द्विवेदी यांनी दिली .
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यातील मसुदा व कृषी रोजगार आणि गरिबी निर्मुलन समितीत बाळासाहेब थोरात यांना संधी मिळाली. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंह यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीत जेष्ठ नेते ए.के,अ‍ॅन्टोनी, मुकुल वासनीक, माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम, गुलाम नबी आझाद, मल्लीकार्जुन खर्गे, बाळासाहेब थोरात, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदसिंह , खा.अहमद पटेल, अशोक गहलोत, शशी थरूर, ज्योतीरादित्य शिंदे, राजीव सातव यासंह वरीष्ठ नेत्यांचा समावेश आहे. तर पक्षाच्या कृषी, रोजगार व गरिबी निर्मुलन समितीत भूपिंदरसिंह हुड्डा यांचे अध्यक्षतेखाली मिनाक्षी नटराजन, बाळासाहेब थोरात, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदसिंह यांच्यासह आणखी पाच जणांचा समावेश आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.