भिंगार रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी खटाटोप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भिंगार शहरातील विशाखापट्टणम् या राष्ट्रीय महामार्गाचे थांबलेले काम बुधवारपासून सुरू करण्यात आले. राजकीय पक्षाने केलेल्या आंदोलनामुळेच काम सुरू झाल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र या भागातून जाणारी पाइपलाइन स्थलांतरीत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेच काम थांबवले होते. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पाइपलाइनचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुढील टप्प्यातील काम लवकरच सुरू होणार होते, याची कुणकुण लागताच आंदोलन करुन कामाचे श्रेय घेण्यासाठी काही जणांनी आटापिटा केल्याचे आता उघड झाले आहे. भिंगार शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या कामास ऑगस्ट २०१६ मध्येच मंजुरी मिळाली होती. या महामार्गाचे बहुतांश कामही पूर्ण झाले आहे. भिंगार शहरातील मुख्य रस्त्याच्या खालील पाइपलाइनच्या स्थलांतरामुळे पुढील काम रखडले होते. याकडे दुर्लक्ष करुन तसेच काम केले असते तर भविष्यात जुनी झालेली ही पाइपलाइन फुटून रस्ता खराब होण्याचा धोका होता.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यामुळे ही पाइपलाइन बाहेरुन नेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार कार्यवाही होऊन काम पूर्ण झाले होते. मंगळवारी (२० फेब्रुवारी) महामार्ग प्राधिकरणाकडून पुढील टप्प्यातील कामास सुरुवातही केली जाणार होती. या प्रकाराची माहिती मिळताच त्याआधीच आंदोलन करुन श्रेय घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला. रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आंदोलनही केले. या आंदोलनानंतर लगेच तिसऱ्या दिवशी काम सुरू झाले. त्यामुळे आंदोलनाच्या दणक्यानेच काम सुरू झाल्याचे सांगितले गेले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.