मी सामान्य जनतेची कामे करणार - सुजय विखे पाटील

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामान्य जनतेची कामे केली जातील. रेशनकार्ड उपलब्ध करून देणे, निराधारांना संजय गांधी योजनेची प्रकरणे करण्यासाठी मदत, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिला बचत गटांना मार्गदर्शन करणे, तसेच आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
श्रीगोंदे येथील डॉ. सुजय विखे यांचे संपर्क कार्यालय व जनसेवा फाउंडेशनच्या कार्यालयाच्या उद्घाटन संपन्न झाले यावेळी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, सुभाष डांगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, राजू गोरे, प्रा. तुकाराम दरेकर, बाळासाहेब गिरमकर, अनिल वीर, बाळासाहेब मोहरे, हेमंत ओगले, दादासाहेब साबळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी राज्यातील आणि केंद्रातील सरकार केवळ स्वप्नरंजन करत असल्याचे सांगितले. कर्जमाफीत सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून त्याची किंमत त्यांनी मोजावी लागेल. सरकारने जनतेमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू केले आहे. याचसाठी सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून सुरू केली. या निवडणुकीसाठी लाखो रुपयांचा चुराडा होत आहे. गावोगावच्या राजकारणात गट पडत आहेत, अशी टीका विखे यांनी केली.

सुजय विखे यांच्या जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामान्य जनतेची कामे होणार आहेत. आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काम केले जाणार आहे. सुजय यांचे हे काम सकारात्मक आणि लोकाभिमुख पाऊल ठरेल, असे विखे म्हणाले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आमदार राहुल जगताप म्हणाले, डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदे मोठी जबाबदारी घेणार आहे. आपणही मनात शंका आणू नका. पुढची निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढणार आहे. याबाबत नेते एकत्र बसून निर्णय घेतील. मिळेल ती भूमिका आपण पार पाडू, असे सांगत विखे यांनी सर्वांना एकत्र आणले असल्याचे जगताप यांनी नमूद केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.