माजी खा. तुकाराम गडाख पुन्हा सक्रीय ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आदर्श विद्या मंदिर शाळेच्या माध्यमातून सोनईत माजी खासदार तुकाराम गडाख यांनी शिव जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम घेतला, तसेच सोनई गावातून मोठी मिरवणूक काढून गावातील प्रत्येक घरात जाऊन ग्रामस्थांचे दर्शन घेतल्याने सोनई परिसरात त्यांच्या नवीन राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. यानिमित्त तालुक्यातील अनेक जुने कार्यकर्ते सोनईत आले होते.

फाईल फोटो - माजी खासदार तुकाराम गडाख. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
माजी खासदार तुकाराम गडाख हे अनेक वर्षांपासून सक्रीय राजकारणापासून लांब आहेत; परंतु तीन वर्षांपासून नेवासा तालुक्यात लग्न, दहावे, सांत्वनभेटी या ठिकाणी त्यांची नेहमी उपस्थिती असते. गडाख यांचा झंझावात तालुक्याला परिचित आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ते तालुक्यात प्रसिद्ध आहेत.

तालुक्यात असलेल्या विविध घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष असून आगामी काळात ते काय भूमिका घेतात यावर अनेकांचे लक्ष आहे. शंकरराव गडाख कुठल्या पक्षाकडून उभे राहतात, राष्ट्रवादीचा कोण उमेदवार असेल, भाजप पक्षाकडून कुण्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, शिवसेना, काँगेस पक्षाची काय रणनीती असेल, असे विविध प्रश्न आहेत, परंतु येणाऱ्या वर्षात विविध प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे..
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सकाळी ९ वाजता मिरवणूक राहुरी रोड येथून सोनईतील पेठेतून गेली. गावात वेगवेगळ्या ठिकाणी पूजन करण्यात आले. डोलीबाजा, लेझीम पथक तसेच अनेक महिलांचा सहभाग यात होता. माजी खासदार तुकाराम गडाख त्यांच्या सोबत शिवसेनेचे प्रकाश शेटे, राजू देसरडा, दादासाहेब होन, शिवाजी बाफना, खंडू निमसे, दत्तात्रय गडाख, संतोष तेलोरे, राजेंद्र बोरुडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.