जामखेड मध्ये पुर्व वैमनस्यातुन डॉक्टरवर गोळीबार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : पुर्व वैमनस्यातुन जामखेड शहरातील डॉ सादिक पठाण वय ४० रा जामखेड व त्यांचा जोडीदार कय्युम पठाण वय ३५ वर्षे या दोघांवर जामखेड शहरातील नगर रोडवरील पंचायत समिती समोर गाडी आडवुन हल्ला करत गोळीबार केला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. 

जामखेड-अहमदनगर मार्गावर पंचायत समिती कार्यालयासमोरून गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सादीक पठाण (रा.माळवाडी.ता.पाटोदा.जि.बीड) व कय्युम शेख हे दोघे कारमधून जात असताना पंचायत समितीसमोर स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गोळीबार केला. हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या. त्यातील ती गोळ्या या पठाण यांना तर दोन गोळ्या शेख यांना लागल्या. गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले आहेत. दोन्ही जखमींनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.